Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकायाकल्पमध्ये जिल्हा रुग्णालयाची ‘हॅट्ट्रिक’

कायाकल्पमध्ये जिल्हा रुग्णालयाची ‘हॅट्ट्रिक’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाने सुरू केलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाने सलग तिसर्‍या वर्षी बाजी मारली.

- Advertisement -

राज्यभरातील सरकारी रूग्णालयांना मागे टाकत 50 लाखाचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. मालेगाव उपजिल्हा रूग्णालय राज्यात दुसरे असून त्यास 20 लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेत आनंदी वातावरण आहे.

आरोग्य विभागाकडून मंगळवारी ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. आरोग्य विभागाने सरकारी रूग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी ’कायाकल्प’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत रूग्णालयातील स्वच्छता, पेशंट व कर्मचार्‍यांची वैयक्तिक स्वच्छता, हॉस्पिटलमधील कचरा, पूरक सुविधा, इन्फेक्शन कंट्रोल व हॉस्पिटलमधील सुविधा या घटकांकडे लक्ष पुरविले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या