जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणूक : 21 जागांसाठी आज मतदान

सत्ताधारी, विरोधी पॅनलकडून विजयाचा दावा
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणूक : 21 जागांसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासकीय कर्मचार्‍यांची आर्थिक वाहिनी समजली जाणारी जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या 21 जागांसाठी आज (दि.2) मतदान होत असून यासाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी नंतर दोन आवडयांपासून दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप फैरी सुरू होत्या.या निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनल व विरोधी सहकार पॅनलमध्ये दुरंगी सामना होत आहे.सोमवारी (दि.3) मतमोजणी होणार असून दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे.

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणूक : 21 जागांसाठी आज मतदान
लाच घेणे भोवले; तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

शनिवारी (दि.1) मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणारे साहित्य पोहचले असून मतदानासाठी तब्बल 150 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपासून येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात 20 केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.दरम्यान, बँकेच्या सेवानिवृत्त सभासदाचा मतदान अधिकार वगळण्यावरून ही निवडणुक चांगलीच चर्चेत आली.यावरून दोन्ही पॅनल कडून आरोप प्रत्यारोप हे झाले.

सहकार प्राधिकरणाने शासकीय कर्मचारी बँका, पतसंस्था, नागरी बँकांच्या कायद्यात दुरुस्ती केली. यात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे सभासदत्व अबाधित ठेवत त्यांचा मतदानाचा अधिकार कमी करण्याचा शासन आदेश काढला होता. या आदेशाला स्थगित मिळवत निवृत्त सभासदांना पुन्हा मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. परंतू, विरोधकांकडून राज्य शासन आदेश स्थगितीवर निर्णय द्यावा, अशी याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने निवृत्त कर्मचार्‍यांचा कमी केलेल्या मतदानाचा अधिकारास दिलेली स्थगिती उठविण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे मतदार यादीत समाविष्ठ झालेल्या 5300 निवृत्त कर्मचा-यांचे नावे पुन्हा वगळण्यात आली आहे. त्यामुळे बँकेचे 7 हजार 942 सभासद मतदानाचा हक्क बजावतील. यातच तीन दिवसांपूर्वी शासनाने निवडणुक स्थगित केली होती. त्यावरूनही सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, त्याविरोधात दोन्ही पॅनलने शासनाला साकडे घालत निवडणुक ठरल्यावेळी घेण्यास साकडे घातले. त्यावर, शासनाने आदेश काढत, निवडणुक ठरल्या वेळेत घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रविवारी मतदान होत आहे. सोमवारी (दि.3) सकाळी 8 वाजेपासून औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथील सभागृहात मतमोजणी होईल ,असे निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा

गत 27 वर्षांपासून पारदर्शकपणे बँकेच्या सभासद हितासाठी काम केलेले आहे. यापुढेही हे काम अविरतपणे करत राहणार. विरोधकांकडे प्रबळ मुद्दे नसल्याने नको ते मुद्दे काढून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, सभासद समता पॅनलला साथ देतील.

रमेश राख ,नेते,समता पॅनल

सत्ताधार्‍यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी सहकार पॅनल रिंगणात उतरला आहे. सत्ताधार्‍यांकडून राबविल्या जात असलेल्या धोरणांना सभासद वैतगले आहेत. बँकेचे सभासद हे बँकेचे मालक असून त्यांच्या हक्कासाठी काम करणार आहे. सभासद परिवर्तन घडवतील असा विश्वास आहे.

उत्तमबाबा गांगुर्डे ,नेते , सहकार पॅनल

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com