Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँकेची आजपासून थकबाकी वसुली मोहीम

जिल्हा बँकेची आजपासून थकबाकी वसुली मोहीम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दीपावली (diwali) संपताच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे (Nashik District Central Cooperative Bank) आपले मोठे व प्रभावशाली असलेल्या तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड (Debt repayment) न करणाऱ्या थकबाकीदारांवर वसुलीची (recovery) कार्यवाही मंगळवार (दि.१) पासून सुरू करणार आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेचा सन २०२२ – २०२३ कर्ज वसुली हंगाम १ नोव्हेबरपासून सुरु होत असल्याने बँकेची एकूण २१५६ कोटीची रक्कम वसुलीस पात्र आहे. त्यापैकी १४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली (Recovery of overdue loans) होण्यासाठी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची / खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्धत व्हावी,

यासाठी बँकेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसुलीबाबत आढावा बैठक घेतळी. यात जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदावर सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने बँकेच्या केंद्र कार्यालयातील अधिकारी / सेवकांना तालुकास्तरावर पाठवून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम (Maharashtra Cooperative Societies Act) १९६० चे कलम १५६ प्राप्त अधिकारानुसार थकबाकीदार सभासदांचे १०१ ची प्रकरणे दाखल करणे, वसुलीबाबत कायदेशीर नोटीस (Legal notice) देणे, तालुका निहाय मोठे १५० थकबाकीदारांच्या याद्या तयार करून कलम १०७ अन्वये जप्ती आदेशानुसार नोंदीची कारवाई करणे, सबंधीत थकबाकीदाराचे अपसेट प्राईज (मुल्यांकन ) प्रकरणे तयार करून स्थावर लिलाव प्रक्रिया राबविणे, मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदाराकडून वसुली करण्याचे आदेश प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

टॉप हंड्रेड याद्या प्रसिद्ध करणार

बँकने ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्कर थकबाकी झालेल्या जिल्हास्तरीय मोठे शंभर थकबाकीदारांची यादी वतर्मानपत्रात प्रसिद्ध करून या सभासदांकडे असलेली थकबाकी व होणारे व्याज भरणा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद देत आजपावेतो ९ सभासदांनी त्यांच्याकडील थकीत रक्कमेचा भरणा केलेला आहे.तसेच लवकरच तालुकानिहाय मोठे शंभर थकबाकीदारांच्या याद्याही प्रसिद्ध करणार आहे.

थकबाकीदारांना आवाहन

जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस व्याज सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करावे,असे आवाहन बँकेच्यावतीने बँकेचे प्रशासक अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी बँकेच्यावतीने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या