Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीचा वाजला बिगुल

जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीचा वाजला बिगुल

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवणुकीचा बिगुल वाजला आहे. यामुळे लवकरच निवडणुकीचे (Election) पडघम वाजण्यास प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेकडे (District Bank) प्राथमिक स्वरूपात मतदार याद्यांची मागणी प्रशासनाने केल्याचे सुत्रांकडून समजले.दि.२७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी (Voter List Publish) झाल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील १३ जिल्हा सहकारी बँकांची निवडणुक प्रक्रीया सुरू झाली आहे. सहकारी निवडणुक अधिकाºयांकडून बँकांची अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्याचा सुधारीत कार्यक्रम राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. यामुळे नाशिक जिल्हा बँकेच्या निवणुकीचाही बिगुल वाजला असून जिल्हा बँकेकडे प्राथमिक स्वरूपात मतदार याद्यांची मागणी प्रशासनाने केल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे मतदार याद्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. इच्छूकांकडून मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली होती.परंतु, करोना संकटादरम्यान जवळपास चार वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया (Election Process) सुरू झाली होती. मार्च २०२१ मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करण्यापर्यंत ही प्रक्रिया आली होती. मात्र, पुन्हा करोनाची दुसरी लाट आल्यामुळे ही प्रक्रिया थाबली, त्याच टप्प्यावर ३१ आॅगस्टपर्यंत राज्य शासनाने निवडणूकस्थगित केली होती. ही स्थगिती संपण्यापूर्वीच राज्य शासनाने सहकार विभागाला आदेश देत रखडलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश काढले.

त्यानुसार सागंली, सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik), धुळे, नंदुरबार, जळगाव (Jalgaon), सिंधूदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सहकार विभागाने केली.

२७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी

सहकार विभागाने तयारी सुरू केल्यानंतर नाशिक जिल्हा बॅक निवडणुकीबाबत संभ्रमावस्था होती. जिल्हा बँकेवर आरबीआय अतंर्गत प्रशासकाची नेमणूक झालेली आहे. बँकेची आर्थिक स्थिती देखील दयनीय आहे. त्याबाबतचा अहवाल सहकार आयुक्तांकडे दाखल झालेला आहे.

याबाबतचा निर्णयाची प्रतिक्षा असताना, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषीत केला आहे. २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. हा कार्यक्रम घोषीत झाल्याने नाशिक जिल्हा बँकेचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालीना वेग येणार आहे. प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी प्राथमिक स्वरूपातील मतदार याद्या बँकेकडे विभागीय सहनिबंधक कार्यालयाने मागविल्याचे कळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या