भूकंपप्रवण क्षेत्रात जिल्हा प्रशासन करणार जनजागृती

भूकंपप्रवण क्षेत्रात जिल्हा प्रशासन करणार जनजागृती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (Mild earthquake tremors)जाणवल्याने जिल्हा प्रशासन जनजागृती मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सुरगाणा, पेठ तसेच दिंडोरीचा काही भाग हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नेहमीच काही गूढ आवाज तसेच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. हा भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी असलेल्या लोकवस्त्यांमध्ये भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी ? तत्परतेने काय भूमिका घ्याव्या ? याबाबत जिल्हा प्रशासन आणि मेरी संस्था जनजागृती करणार आहे.

दिंडोरी शहरासह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने घाबरून न जाण्याचे आवाहन केले मात्र हे धक्के नेमकं कोणत्या कारणाने झाले याची खात्रीशीर माहिती मिळाली नव्हती. याच पार्श्वभूमीवर ही जनजागृती मोहीम होणार आहे. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी शहर, मडकीजांब , हातनोरे, निळवंडी , जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसले होते. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com