शिक्षकाकडून स्वखर्चाने राष्ट्रध्वजाचे वाटप

शिक्षकाकडून स्वखर्चाने राष्ट्रध्वजाचे वाटप

निफाड । प्रतिनिधी Niphad

भारत स्वातंत्र्याच्या 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला ‘आझादी का अमृत महोत्सव’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga Campaign ) या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबोधन नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे ही भावना जागृत करणे ही या उपक्रमामागची कल्पना आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जात आहे.

यानिमित्ताने विद्यार्थी व पालकांच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षक गोरख सानप ( Gorakh Sanap- Teachear, Vainatey Primary School ) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वखर्चाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजांचे वाटप केले. वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एम.एस. माळी, उपप्राचार्य बी.के. ठोके, पर्यवेक्षक टी.एस. तलवारे, एन.डी. शिरसाठ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षक गोरख सानप यांनी राष्ट्रध्वज वापरासंबधी चे नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला बळ देऊन नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्याचा प्रतिकांबद्दल आदराची भावना जागृत करण्यासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे न्या.रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. ल.जि. उगांवकर, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि.दा. व्यवहारे, किरण कापसे, राजेश सोनी, राजेंद्र राठी, विश्वास कराड, अ‍ॅड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, नरेंद्र नांदे, गटशिक्षण अधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्र प्रमुख नीलेश शिंदे आदींसह पालकांनी कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव, कल्पना पेठे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com