गिरणा गौरव पुरस्कारांचे वितरण

दैनिक देशदूतच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला कार्यकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांना पुरस्कार
गिरणा गौरव पुरस्कारांचे वितरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जेथे नद्या ( Rivers )स्वच्छ निर्मळ व अंखंड वाहतात. त्या नदी कठावारील समाज समृध्द राहतो. म्हणुनच नद्यांमध्ये मातीचे भराव, अतिक्रमणे करून नद्या नष्ट करण्याच्या प्रयत्नांंना विरोध करणे आवश्यक झाले आहे. या नद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा डाव हाणून पाडणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह ( Dr. Rajendra Singh )यांंनी आज येथे केले. गिरणा गौरव प्रतिष्ठाणच्या ( Girna Gaurav pratishthan )'गिरणा गौरव पुरस्कारांचा शानदार वितरण ( Distribution of Girna Gaurav Puraskars ) सोहळा आज डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. आनंद अ‍ॅ‍ॅग्रोचे संचालक उध्दव आहेर, स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधीकारी सुमंत मोरे, निर्माण ग्रुपचे संंचलाक नेमीचंदं पोद्दार, रुग्ठा ग्रुपचे अभीषेक बुवा, सुदर्शन न्युजचे दीपक चव्हणके, गिरणा गौरव प्रतीष्ठणचे अध्यक्ष सुरेश पवार, भरत गोसावी आदी प्रमुख अतिथी होते.

पद्मश्री निलीमा मिश्रा, ज्येष्ठ साहीत्यीक राजन गवस, गितकार गुरु ठाकुर, दैनिक देशदूतच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला कार्यकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले( Dr. Vaishali Balajiwale, the first woman executive editor of Dainik Deshdoot in North Maharashtra ), रुक्मीर्नीताई दराडे, माजी माहिती संचालक शिवाजी मानकर, यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठी साहित्य संमेलन अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्याबद्द्ल संमेलनाचे स्वगातध्यक्ष म्हणुन पालकमंत्री भुजबळ यांचा व शेतक़र्‍‌‌यांना मित्रत्वाच्या नात्याने मदतीचा हात दिल्या बद्दल पाटील यांचा विशेष गौरव झाला. कालिदास कला मंदीरात झालेल्या या सोहळ्यात गेल्या तीन वर्षाचे पुरस्कार यावेळी वितरीत करण्यात आले.

पुरस्कारार्थीं मध्ये वरील मान्यवरांसह डॉ निशीगंधा वाड, डॉ. राजेंद्र भाारुड, दिलीप स्वामी, शिल्पा देशमुख, महेश पवार, राजन पाटील, पंकज चंद्रकोर, सुनंदा सोनी, बिंदु शर्मा, शैक्षणिक कार्यात विशेष योगदाना बद्दल मच्छिंद्रनाथ कदम, नाटककार,दिग्दर्शक शंभू पाटील (जळगाव),सुप्रसिद्ध प्रकाशिका,कवयित्री सुमतीताई लांडे (अहमदनगर),ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अनिल निकम ,(नाशिक), आदर्श शिक्षक पत्रकार खंडु मोरे (देवळा) शिल्पा देशमुख, ज्यष्ठ पत्रार मिलींद सजगुरे, ,मंगला बनसोड, हर्शवर्धन सदगीर, डॉ. जगन्नाथ दीक्षीत, बंडु चव्हाण , दीपक देवरे, रेखा महाजन, गंगा पगार, कैलास खैरनार, तनया भालेराव, नानासाहेब जाधव, आदीचा यथोचीत सन्मान झाला.

रविद्र मालुंजकर यांनी सुत्रसंचालन केले. रेखा महाजन यांनी स्वागत गीत सादर केले. भावेश बागुल यांच्या कलाकारांंनी नृत्य सादर केले.तेजस्वीनी कदम यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वाती पाचपांडे यांनी प्रास्तावीक केले. यावेली फुटाणे, सचिन पाटील यांचे भाषण झाले. निवड समितीचे अध्यक्ष कवी राजू देसले कवी प्रकाश होळकर डॉ. निर्मोही फडके ,डॉ. स्वप्नील तोरणे ,प्रवीण बांदेकर आदीसह विविध क्षेत्राताल मान्यवर यावेळी उपस्थीत होते. शितल गायकवाड यानी आभार मानले.

गोदावरीच्या सन्मानासाठी तिला स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची - पालकमंत्री छगन भुजबळ

एका नदीच्या नावाने गिरणा प्रतिष्ठान उभं राहते आणि अविरत २३ वर्ष काम करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नदीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्या नदीचा सन्मान आहे. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर पोहचविण्याचे श्रेय खर्‍या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठाण या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा यासाठी तिला स्वच्छ सुंदर ठेवणं आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ते म्हणाले की, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, लोककलांचा जागर करणारी संस्था म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठान आहे. असून संस्थेच्या अध्यक्ष सुरेश पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व जोडली आहे. या माणसं जोड प्रकल्पातून निरंतर आशा व उमेद घेऊन हि संस्था अनेकांची ऊर्जा बनली. नाशिक प्रत्येक माणसाला आपलेपण देणारी परिपूर्ण संस्था, हात नको मनं जोड़ा मनामनातल अंतर तोडा’ हे ब्रिद घेऊन माणुसपणाचा शोध घेणारी संस्था दोन पाऊल पुढे टाकुन माणुस हाच केंद्रबिंदू मानत गेल्या २३ वर्षांपासून माणस शोधत आहे.

या संस्थेला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकिय, कृषी, उद्योग, कला व क्रिडा आदी क्षेत्रात जाऊन माणुसपणाची चळवळ राबवली आहे. हात नको, मने जोडा हा संदेश देत रोजच्या धकाधकीत हक्काची म्हणावी अशी माणसेही जमविली आहेत. असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com