राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून धान्याचे वितरण सुरू

मोफत धान्याचे 58 लाख लाभार्थी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून धान्याचे वितरण सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेअंतर्गत (Central Government's National Food Security Scheme )शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील 58 लाख 50 हजार 554 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरूदेखील झाली आहे.

स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंतोदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून नियमित धान्याचे वितरण केले जाते. त्यामध्ये 3 रुपये प्रतिकिलो तांदूळ व 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो. देशभरातील कोट्यवधी लाभार्थी या धान्याचा लाभ घेत आहेत. करोनाकाळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून तब्बल दीड वर्ष मोफत धान्य वितरीत करण्यात आले. परिणामी करोनाच्या संकटात नियमितसह मोफतच्या धान्यामुळे गोरगरीब जनतेला आधार मिळाला. मागील वर्षी देशतील काही भागात अधिक पाऊस तर काही राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे धान्याचे उत्पादन कमी झाले. त्यातच मोफतच्या धान्याला डिसेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याने देशभरातील लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

ही नाराजी लक्षात घेता केंद्र शासनाने मोफत धान्य देणे बंद करताना 2023 मध्ये संपूर्ण वर्षभर नियमितचे धान्य मोफत देण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घोषित केला. मात्र, त्याचे आदेशच स्थानिक स्तरावर पोहोचले नव्हते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवरून प्रशासनही साशंक होते. जिल्हा पुरवठा विभागाला मोफत धान्य वितरणाबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर याकाळात लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण केले जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डची संख्या 12 लाख 83 हजार 043 इतकी असून त्यावरील लाभार्थी संख्या 58 लाख 50 हजार 554 इतकी आहे. या सर्व लाभार्थ्यांना चालू महिन्यापासून मोफत धान्य उपलब्ध होणार आहे.

तालुकानिहाय रेशनकार्डची संख्या व कंसात लाभार्थी संख्या

बागलाण - 75 हजार 880 (348,238), चांदवड - 40843 (186911), देवळा - 30101 (136 975), दिंडोरी 58112 (270510), मालेगाव - 150525 (743880),नाशिक - 285284(1246772), इगतपुरी - 45912( 230246),कळवण - 41234 (175802), मालेगाव- 82,439 (364,854), नांदगाव - 61613 ( 268033), नाशिक - 109234 (489531),निफाड - 94148 (417038), पेठ - 25125 (106809), सिन्नर - 68649 (316,643), सुरगाणा - 33305 (156687), त्र्यंबकेश्वर - 28328 (157991), येवला - 52311 (233634).

एकूण 12 लाख 83 हजार 43 (58 लाख 50 हजार 554).

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com