Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालोकं घरी बसून काम करत होते तेव्हा माझा शेतकरी...; काय म्हणाले राज्यपाल?

लोकं घरी बसून काम करत होते तेव्हा माझा शेतकरी…; काय म्हणाले राज्यपाल?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला देशाची आर्थिक राजधानी वैगेरे म्हणत असतील परंतु आपले राज्य हे हिंदुस्थानचे (Hindustan) कृषी राज्य आहे. करोना (Corona) काळात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) सुरु होता; लोकं घरी बसून काम करत होते तेव्हा फक्त एकच वर्ग ऑन फिल्ड काम करत होता; तो वर्ग म्हणजे माझ्या शेतकऱ्याचा वर्ग होय. असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य शासनाच्या (State Government) शेतकरी सन्मान पुरस्कार (Farmer Honors Award) वितरण सोहळ्यात काढले….

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) येथे झालेल्या राज्यातील कृषि, फलोत्पासदन आणि संलग्नह क्षेत्रामध्येम उल्लेषखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पालदन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या (Agriculture Department) वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान आले.

कृषि, फलोत्पारदन आणि संलग्न क्षेत्रामध्येल उल्ले खनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पायदन- उत्परन्नन वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्ताररामध्येन बहुमोल कामगिरी करणा-या व्यीक्तीद, संस्था , गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्या्त आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने तर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाडी भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि कृषी राज्यमंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

…जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात

राज्यपाल म्हणाले की, दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासारखे कृषीमंत्री आपल्या राज्याला लाभले आहे. मला राजभवनात ते वनभाज्या आणून देतात. त्यामुळे मला माझ्या आईवडिलांची आठवण येत असते.

तुम्हा सर्व शेतकऱ्यांचा बहुमान होत असतानाच मला माझा बहुमान होत असल्याचे वाटत आहे कारण मी सुद्धा एक शेतकरी दाम्पत्याचा मुलगा आहे. माझ्याकडे नरहरी झिरवाळ नेहमी येत असतात; लोकांना राजभवन दाखवत असतात आज मी झिरवाळ यांचे गाव बघायला आलो आहे. नाशिकमध्ये सुजलाम सुफलाम शेती आहे. येथे खऱ्या अर्थाने स्वर्ग नांदत आहे.

मी उत्तराखंडच्या लोकांना नेहमीच सांगत असतो की, महाराष्ट्रात या, इकडचे लोकं कसे शेती करतात ते शिका. पुण्य कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, शेतकरी हा अन्न पिकवितो, अनेकांचे पोट त्यामुळे भरत असते. हे सर्वात जास्त महत्वाचे पुण्य संचयाचे काम आहे.

Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दुरदृश्यप्रणालीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी देखील पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांबद्दल ऋण व्यक्त करताना गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, आपल्याला राज्य शासनातर्फे पुरस्कार देताना मला अतिशय आनंद होत आहे. तुमचे अभिनंदन करण्यापेक्षा तुमचा मी आभारी आहे; कारण तुमच्या सारख्या अन्नदात्याचा बहुमान करण्याचे भाग्य या शासनाला लाभले आहे.

अन्नदाता सुखी तर देश सुखी; तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे वैभव आहात. पुरस्काराच्या रकमेत बाध करण्याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. लवकरच त्यात वाढ होईल. करोनाच्या संकटकाळात माझा शेतकरीच ठाण मांडून बसला होता. अनेक संकटांना परतवून लावण्याची ताकद या शेतकरी राजा मध्ये आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले असतानाच माझ्या राजानेच राज्याची अर्थव्यवस्था सांभाळून धरली होती. या राजाचे जगणे सुसह्य करणे हे आपल्या सरकारचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. आपले सरकार आल्यावर सर्वप्रथम कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला. तो अमलात पण आणला मात्र, करोना आल्याने त्यावर थोडे निर्बंध आले. आता परिस्थिती सुधारली आहे; तर पुन्हा आपण कर्जमुक्ती करणार आहोत. जे जे शक्य आहे; ते ते मी करणारच आहे.

Visual Story : …म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरुवातीलाच पुरस्कार रकमेमध्ये पाच पट वाढ करत असल्याचे सांगितले. शेतकरी हा आख्या देशाचा कणा आहे. त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था आणि आपला जीडीपी इतर राज्यांना तुलनेत सक्षम राहिला आहे. या शेतकरी राजाने जर त्या कठीण काळात पिकविले नसते तर आज वाताहत झाली असती. आपण सर्वांनी आम्हाला आपला सन्मान करण्याचा बहुमान दिलेला आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक करताना करोनामुळे गेली दोन वर्षे हा पुरस्कार सोहळा घेतला गेला नाही. आता सलग टीन वर्षाचे पुरस्कार आपण वितरीत करत आहोत. यामध्ये एकूण १९८ पुरस्कारार्थींचा गौरव होत आहे. गल्लीपासून ते मुंबईमधील ५० व्या मजल्यापर्यंत भाजीपाला पोहचविण्याचे काम या शेतकरी राजाने केले आहे.

मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा ‘पुष्पा’ डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

शेतकऱ्यांना (Farmers) पिकवायची माहिती आहे पण विकण्याची नाही म्हणुन आपल्या सरकारने विकेल तेच पिकेल नावाची मोहीम उघडली. तसेच कृषी ग्राम समितीच्या माध्यमातून पाउस, खते, बियाणे, यांचा गोषवारा तयार करून खरीप आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बियाणे, खते काहीही कमी पडणार नाही. मुबलक प्रमाणात सर्व उपलब्ध राहणार आहे. लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून ७/१२ उताऱ्यावर महिलेचेहि नाव आता लागणार आहे.

क्षणचित्रे

– आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कृषी नगरीचे स्वरूप

– शहरात ठिकठिकाणी अन्न्दात्याच्या अभिनंदनाची पोस्टर बाजी

– अन्नदाता शेतकरीसह त्याच्या कुटुंबाची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती

– छायाचित्रणासाठी उत्तम प्रकारे व्यवस्था

कोश्यारी-भुजबळ जुगलबंदी थोडक्यात आटोपली

आजच्या कार्यक्रमात हमारे गार्डन मिनिस्टर भुजबळ यांनी बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही, असे कोशारी म्हणताच भुजबळ यांनी व्यासपीठावरून गार्डन नाही गारडियन मिनिस्टर म्हणा असे संबोधताच सभागृहात एकच हशा पिकला.

राजकीय वक्तव्य नको – पवार

उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी भोंग्याबाबत व्यासपीठावर बोलण्यास टाळले मात्र, शेतकरी राजा हा सुजाण आहे. तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी मी बोलत आहे. यांच्यामागे लागू नका, असा ओझरता सल्ला शेतकऱ्यांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या