Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याडॉ. वसंंतराव पवार स्मृती पुरस्काराचे वितरण

डॉ. वसंंतराव पवार स्मृती पुरस्काराचे वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकर्‍यांना भरघोस उत्पन्न व ग्राहकांनाही विषमुक्त सेेंंद्रीय फळे, भाजीपाला, धान्य मिळण्यासाठी अभिनव फामर्र्र्स क्लब टेक्नॉलॉजी व प्रॅक्टिकलचा सुरेख संगम नीलवसंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंंटर्सशी (Nilavasant Medical Foundation and Research Centers) साधून नाशिककरांंना दर्जेदार सेंंद्रीय शेतमाल (Organic farming product) मिळवून देईल, अशी ग्वाही अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांनी आज येथे दिली.

- Advertisement -

येथील नीलवसंंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर्सतर्फे योगदान दिनानिमित्त दिला जाणारा डॉ. वसंंतराव पवार स्मृती पुरस्कार ( Dr. Vasantrao Smruti Puraskar ) मुळशीचे प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके ( Dnyaneshwar Bodke ) यांना सामाजिक सेवेबद्दल प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार (Neelima Pawar, General Secretary of Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांंना प्रदान करण्यात आला. यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, ज्येष्ठ नेेते सुरेशबाबा पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

बोडके यांचे भारावून टाकणारे भाषण ऐकून सभागृह अक्षरश: आवाक् झाले. एक एकर शेतीतून प्रवास करून साडेचारशे कोटींची उलाढाल असलेला ग्रुप बनवणे व दीड लाख शेतकर्‍यांंना श्रीमंंतीचा रस्ता दाखवणे याचा प्रवास त्यांनी यावेळी कथन केला. ते म्हणाले, डॉक्टर आणि शेतकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डॉक्टरसुद्धा औषध, गोळ्या घेण्यापूर्वी काहीतरी खा, असे सांगतात.त्यामुळे शेतीला दुसरा पर्याय नाही.

भरमसाट पिकवण्यापेक्षा दर्जेदार पिकवा. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तरच भाव वाढवून मिळतो. खूप पैशांच्या मागे लागू नका, रोज एक हजार रुपये कमाईतसुद्धा चांगले जीवन जगता येते.व्यसनापासून दूर राहा, मुलांना संस्कारीत करा, फार पैशांच्या मागे धावणार्‍यांना रक्तदाब अन् मधुमेहाने ग्रासले आहे, हे विसरू नका. शंभर वर्षे स्वत:ही जगा आणि दुसर्‍यांनाही जगू द्या. दर्जेदार शेतमालाला मागेल तो भाव देण्यास ग्राहक तयार आहेत. त्यामुळे ग्राहकांची चिंता करू नका, चांंगले देण्याचा निर्धार करा. नाशिकमध्ये आपण निश्चित काम करू. नीलवसंंत फाऊंडेशनची साथ त्यास मिळू द्या, असे ते म्हणाले.

नीलिमा पवार यांनी आपल्या भाषणात सेंद्रीय शेतीसाठी अभिनव फार्मर्स क्लबबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना दर्जेदार सेेंद्रीय शेतमाल मिळण्याची आशा निर्माण झाली. 2005 मध्ये नीलवसंंत फाऊंडेशनची स्थापना झाली. त्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. तसेच वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनी समाजात उत्कृष्ट कार्य करणार्‍यांची निवड करून त्यांना स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो.

यंदा शेती क्षेत्रात उल्लेेखनीय कार्य करणार्‍या बोडके यांना एक लाख रुपयांंचा धनादेश, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्राची पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंंद्रकांत संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव खैरनार यांनी परिचय करून दिला. यावेळी डॉ. वसंतराव बेळे, रंजना पाटील, शशिकांत जाधव, ओमप्रकाश कुलकर्णी, प्रणव पवार, प्राचार्य व्ही.बी. गायकवाड, विजय कोठारी, प्र.द कुलकर्णी, रवींद्र मणियार, नारायण थेटे, डॉ. सुनील ढिकले, नानासाहेब महाले, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या