प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

दिल्ली । Delhi

प्रियकर प्रेयसीमध्ये वाद झाल्याच्या घटना काही नवीन नाही. सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रेयसीमध्ये झालेल्या वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील रीवा (Riva) येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

या व्हिडिओत एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण दिसतो आहे. यात प्रेयसी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करताना दिसते. मात्र, नाराज होऊन प्रियकर अतिशय निर्दयीपणे प्रेयसीला कानशिलात लगावतो. इतक्यावर तो थांबत नाही तर पुढे तिला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करतो. तो तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर लाथांनी मारतो. यात ही तरुणी तिथेच बेशुद्ध होते. व्हिडिओतील दृश्ये आपणास विचलीत करु शकतात.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…

सोशल मीडियावर कथित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, मौगंज पोलिस स्टेशन हद्दीतील ढेरा गावात आरोपीचे घर बुलडोजर लावून पाडण्यात आले आहे. मौगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी श्वेता मौर्य यांना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
विवाहितेचा मृतदेह हौदामध्ये आढळल्याने खळबळ, पतीसह सासू पोलिसांच्या ताब्यात.. कुठे घडली घटना?

दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, रीवा जिल्ह्यातील मौगंज भागात एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंकज त्रिपाठी या गुन्हेगाराला अटक करून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. तसेच, चालक पंकजचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर महिलांवर अत्याचार करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com