
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
एका कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देवळाली गाव येथे दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावरण बाचाबाचीत झाले त्यानंतर शिवीगाळ व वाद झाले या वादातूनच एका गटातील व्यक्तीने स्वतः जवळ असलेले पिस्तूल बाहेर काढले व त्यातून हवेत गोळीबार केला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात पळापळ झाली व नंतर वातावरण तंग झाले परिणामी ही घटना उपनगर व नाशिक रोड पोलीस यांना समजतात त्या ठिकाणी तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला.
दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी नाशिक रोड परिसरात समजतात अनेक ठिकाणी दुकाने बंद झाली तर काही भागात पळापळ झाली या घटनेमुळे देवळाली गावात वातावरण तंग झाले असून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्य पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर अनिल शिंदे गणेश नायदे राजू पाचोरकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले व परिस्थिती काबुत आणली दरम्यान यावेळी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला असल्याचे समजते.
दरम्यान घटनास्थळी पोलिसांची ज्यादा कुमुक मागविण्यात आली आहे याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या संपूर्ण देवळाली गाव परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.