Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

ठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे समर्थक आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) कार्यकर्त्यांमध्ये धारावीत (Dharavi) वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) ठाकरे गटातील सात ते आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविद कलमांतर्गत धारावी पोलिसांनी (Dharavi Police) गुन्हा दाखल केला आहे.

रिडन फ्रान्सिस फर्नांडो यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश सूर्यवंशी, मुथू पठाण, चेतन सूर्यंवशी यांच्यासह इतर चार ते पाच कार्यकर्त्यांविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धारावी मिल कंपाऊंड येथील मॉर्निंग स्टार शाळेत सदा सरवणकर (Sada Saravankar) गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान वाद झाला. बैठक संपल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला.

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

पोलिसांनी (Police) मध्यस्ती करीत शिवसैनिकांना शांत केले. त्यानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गणपतीच्या काळात एकमेकांना चिथावणी दिल्यामुळे शिंदे गट व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या पाठोपाठ आता धारावीतही पुन्हा नवा वाद झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या