
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
उत्तर महाराष्ट्राच्या विभागीय आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पाडली. या बैठकीत मालेगाव (Malegaon) जिल्हा निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली....
आढावा बैठकीत देवळा आमदार डॉ. राहुल आहेर (Dr. Rahul Aher) यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीत चांदवड, देवळा तालुका समावेशाचा कडाडून विरोध केला. जिल्हा निर्मिती करावी, परंतु मालेगावमध्ये आमचा समावेश करू नका, अशी देवळा व चांदवड तालुक्यातील जनतेची इच्छा असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच मालेगाव जिल्हा निर्मिती करा, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली. जिल्हा निर्मिती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. यामुळे मालेगावसह परिसरातील तालुक्यांचा विकास होणार आहे. याचे राजकारण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, जनतेचे हित बघा अशी विनंती आमदार मौलाना मुफ्ती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आढावा बैठकीत बोलताना केली.
यंत्रमाग उद्योगास चालना देण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर योजना राबवली जावी. टेक्स्टाईल सिटीची सवलत द्यावी तसेच 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेत असलेल्या मालेगावातील तरुणांची मुक्तता करावी, अशी मागणी आमदार मौलाना यांनी यावेळी केली आहे.