सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला 'हा' निर्णय

सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला 'हा' निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुरगाणा तालुक्यातील 55 गावांचा विकास करण्याच्या मुद्यावर पालकमंत्र्यांनी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुजरातमध्ये जाण्याची भूमिका घेऊन सुरु केलेले आंदोलन आज तूर्तास मागे घेण्यात आले आहे...

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास साधक-बाधक चर्चा झाली. मार्क्सवादी पक्षासह 20 सरपंचांनी आपण महाराष्ट्र सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट करुन विकास झाला पाहिजे यावर आग्रही राहण्याची भूमिका जाहीर केली.

सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला 'हा' निर्णय
५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

सुरगाणा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी गुजरातमध्ये जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर गेल्या चार दिवसापासून जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. कालच जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने सुरगाणा तालुक्याला भेट देऊन माहिती जाणून घेतली होती.

त्यानतंर आज पालकमंत्री दाद भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. आ. नितीन पवार, संघर्ष समितीचे नेते चिंतामण गावित, तसेच हिरामण गावित, रणजीत गावित यांच्यासह 20 सरपंच व आंदोलक यात सहभागी झाले होते.

सुरुवातीला चिंतामण गावित यांनी गेल्या 75 वर्षांपासून रखडलेल्या विकासाकडे लक्ष वेधले. मुल जन्माला येण्यापासून आमचा गुजरातशी संबंध असतो. येथे अधिकारी थांबत नाही. आदिवासी भागात राहण्याचा फक्त भत्ता घेतात. जेवण करुन नाशिकला निघून येतात. शाळा गळक्या आहे. दवाखाना आहेत तर डॉक्टर नसतात. स्रीरोग, बालरोग तज्ञ तर शोधूनही सापडत नाही. अशा विविध ज्वलंत प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले.

सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला 'हा' निर्णय
सप्तशृंगी गड : विश्वस्थांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक, पाहा व्हिडीओ

पालकमंत्र्यांनी या विकासापासून वंचित राहिलेल्या तालुक्याबद्दल खंतही व्यक्त केली. मात्र 75 वर्षांपासून रखडलेले प्रश्न आता 75 तासात सुटणे शक्य नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवा. टोकाची भूमिका घेऊ नका, जिल्हापातळीवरील प्रश्न आपण तातडीने सोडवू. राज्य स्तरावरील प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवून देऊ. असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले जात असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रलंबित प्रश्न आणि रखडलेल्या प्रकल्पाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचनाही अधिकार्‍यांना दिल्या.

सुरगाणा ग्रामस्थांनी वाचला पालकमंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा; चर्चेनंतर घेतला 'हा' निर्णय
कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

यावेळी आ. नितीन पवार म्हणाले की, आमची भूमिका गुजरातमध्ये जाण्याच्या बाबत नाही. मात्र रखडलेला विकास झाल पाहिजे ही जनतेची मागणी आहे. गेल्या तीन वर्षात आपण 270 कोटी रुपयांचा विकासनिधी या मतदारसंघात आणून कामे सुरु केली आहेत. काही जणांनी यात स्टंटबाजी असल्याचे आरोप केले. मात्र काहीही असले तरी विकासाच्या मुद्यावर यामुळे लक्ष्य वेधले गेले. याबद्दल समाधानही व्यक्त झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com