
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कालपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. आज सकाळी नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandurmadhyameshwar Dam) पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु करण्यात आला आहे...
पाण्याची पातळी वाढून त्याचा फुगा सायखेडा चांदोरी या पंचक्रोशीत वाढत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शेतात तसेच मळे परिसरात साचत असते. त्याला प्रतिबंध व्हावा म्हणून प्रशासनातर्फे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला मात्र त्यानंतर दडी मारली होती. आता इगतपुरी (Igatpuri), दिंडोरी (Dindori) व त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) पावसाची संततधार सुरु आहे.
यामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या तसेच ओढे-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून यंदाचा पहिला पाण्याचा विसर्ग होत आहे.
नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदीपात्रात २ हजार ४२१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर आणखी पाण्याचा सोडण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.