Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : करंजवण, पालखेडमधून 'इतक्या' क्युसेस पाण्याचा विसर्ग

Video : करंजवण, पालखेडमधून ‘इतक्या’ क्युसेस पाण्याचा विसर्ग

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) सर्वात मोठे तसेच दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला व मनमाड तालुक्याची तहान भागवणारे करंजवण धरण (Karanjvan Dam) ८० टक्के भरले आहे. करंजवण धरणातून कादवा नदी पात्रात २० हजार ८५२ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे…

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील वाघाड, करंजवण, पुणेगाव, ओझरखेड धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पालखेड धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्व धरणक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस (Rain) पडत आहे.

खबरदारी म्हणून पालखेड धरणातून (Palkhed Dam) ३६ हजार ५४२ क्युसेस इतका विसर्ग कादवा नदीत (Kadwa River) सोडण्यात आला आहे. अजूनही दिंडोरी तालुक्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे.

करंजवण धरणातून कादवा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ओझे करंजवण कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे तर म्हेळुस्के-लखमापूर कादवा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या