Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर, दारणातून विसर्ग सुरूच; पूरस्थिती कायम

गंगापूर, दारणातून विसर्ग सुरूच; पूरस्थिती कायम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुक्काम ठोकलेल्या वरुणराजाने काल नाशिकमध्ये थोडी विश्रांंती घेतली. मात्र धरण क्षेत्रात व त्रंबक तालुक्यात पाऊस कायम असल्याने गोदावरीची वाढलेली पातळी कायम आहे. गंगापूर, दारणा धरणातून विसर्ग सुरु राहिल्यानेे गोदावरी व दारणा नदी परीसरात पूर कायम होता. नद्या धोक्याची पातळी ओलांंडून वाहत आहेत.

- Advertisement -

सध्या जिल्हाभर नदी नाले ओसंडून वाहत आहेत. आठ धरणातून विसर्ग सुरु आहे. अजून तीन दिवस नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा आता 28 वरुन सरासरी 63 टक्कयांवर येंऊन पोचला आहे. गंगापूर, दारणा,पालखेड,चणकापूर, नांदुरमध्यमेश्वर या धरणातून विसर्गाला सुरुवात झाली आहे.

गंगापूर धरण 67 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाची पाणी पातळी सुमारे 40 टक्कयांहून अधिक वाढली आहे. सध्या दारणा धरणातून 15 हजार 88 क्युसेस पाण्याचा तर कादवा धरणातून 6 हजार 712 क्युसेस विसर्ग होत आहे. गंगापूर धरणातून कालपासून 10 हजार 35 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून अहिल्याबाई होळकर पुलाखालून 14 हजार 191 विसर्ग होत आहे. दुसरीकडे नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 78 हजार 276 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच काल सकाळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण आणि वाघाड धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

बागलाणमधील हरणबारी प्रकल्पातून मोसम नदीत 5548 क्युसेक विसर्ग सुरु आहे. चणकापूरमधून21272 क्युसेक पाणी वाहत आहे. पालखेड मधुन 30188 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. मुकणे, वालदेवी, आळंदी या धरणांमधून आतापर्यंत विसर्ग सुरु झालेला नाही.मात्र धरण क्षेत्रात सांयंकाळी पाचपर्यत पाऊस सुरु होता. कश्यपी परीसरात 16, गौतमी परीसरात 13, गंगापूरमध्ये 11, त्रंबकेश्वरमध्ये 27 , अंबोली परीसरात 42मिलीमीटर पावसाची नोंद दिवसभरात झाली आहे. आज शाळांना सुटी दिली होती.त्यातच पाऊसही थांबला होता.त्यामुळे शंहरात शांतता होती.जनजीवन पुर्वपदावर आले होते. मात्र शेतात पाणी साचल्याने शेतमाल फारसा बाजारात येऊ शकला नाही.त्यामुळे बाजारात शांतता होती.

पूर पाहण्यासाठी गर्दी कायम

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.अनेक नाशिककरांनी गोदातीरी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. पावसाच्या अनेक आठवणी अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद केल्या आहेत.गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी होळकर पुलाखाली येण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. या अनुषंगाने नाशिककरांनी सोमेश्वर, गंगापूर गावातील काही जागा याठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेतला. महापालिकेकडून अग्निशमन कर्मचारी नदीकाठी तैनात केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून धोक्याच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे.आज कोठेही अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या