नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले?

नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु करण्यात आला आहे....

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २ हजार ९७० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर होळकर पुलाखालून (Holkar Bridge) ७ हजार ५१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

नांदूरमध्यमेश्वरमध्ये (Nandurmadhyameshwar) ४५ हजार ६५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर पालखेडमधून (Palkhed Dam) ८ हजार ५४४ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

दारणा धरणातून (Darna Dam) २ हजार ७०८ क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून कडवा धरणातून (Kadwa Dam) १ हजार ६८० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले?
मोहदरी घाटात 'द बर्निंग कार'चा थरार, पाहा व्हिडीओ...

मुकणे धरणातून (Mukne Dam) १ हजार ८९ क्युसेस तर वालदेवीमधून (Waldevi) ४०७ क्युसेस, आळंदीमधून (Waldevi) ६८७ आणि भोजापूरमधून (Bhojapur) ९९० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले?
टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ...

दरम्यान, पावसाची (Rain) संततधार अशीच सुरु राहिल्यास टप्प्याटप्प्याने आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com