पालखेड धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग

पालखेड धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पालखेड धरणाच्या (Palkhed Dam) पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी (Dam Water Level) वाढली आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्युसेक पाण्याच्या विसर्ग (Water Discharged) सोडण्यात आला आहे...

गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिकसह (Nashik) परिसरात संततधार पावसाने (Heavy Rain) ठाण मांडले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. सर्वच धरणे १०० टक्क्यांकडे वाटचाल करत आहेत. तर धरणांची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नियमानुसार पाणी धरणातून सोडण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कालपासून पावसाचा जोर कायम आहे. काल दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरणातून (Gangapur Dam) काल दुपारी ५०० व सायंकाळी पुन्हा दीड हजार क्युसेसचा विसर्ग सुरु झाला.

त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदाकाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्जतेचे आदेश देण्यात आले आहे.

दारणा धरणातून १००६०, भावलीतून ४८१, वालदेवीतून ६५, कडवातून २२००, नांदुर मध्यमेश्वरमधून १०२७२, आळंदीतून ३०, चणाकापुरमधून २२०, हरणबारीतून २१२ व नागासाक्यातून १०५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com