Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यानांदूरमध्यमेश्वरमधून ३१ हजार क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदूरमध्यमेश्वरमधून ३१ हजार क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे….

- Advertisement -

यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

आज सायंकाळी ७ वाजता नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandurmadhyameshwar Dam) ३१ हजार ८४९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दारणा धरणातून (Darna Dam) ५ हजार ९२४ क्युसेस तर कादवा धरणातून ४ हजार ९५९ क्युसेसने विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २६८ क्युसेसने पाणी सुरु असून होळकर पुलाखालून (Holkar Bridge) ३८९ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

नाशकात जोर’धार’; गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या