Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधीचे वितरण

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधीचे वितरण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचे वेतन (Salary of ST Corporation Employees) तसेच अन्य बाबींसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या १ हजार ४५० कोटींच्या एकूण तरतुदीपैकी १०० कोटींचा निधी (Funds ) वितरीत करण्यात आला आहे. या निधीमुळे एसटी कर्मचार्‍यांचे वेतन देणे महामंडळाला शक्य होणार आहे.

- Advertisement -

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी १ हजार ४५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यासाठी ३६० कोटी इतक्या निधीची आवश्यकता असल्यामुळे एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

अर्थसंकल्पात तरतूद केलेल्यापैकी सध्या ७२० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामधून ३६० कोटी इतका निधी जून, २०२२ च्या वेतनासाठी वितरित करण्याबाबत वित्त विभागास विनंती केली होती. त्यानुसार १०० कोटी रुपये इतकी रक्कम परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी वितरित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. नवीन सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या