जिल्हा बँकेकडून १०२ कोटींचे पीककर्ज वाटप

गतवर्षीच्या तुलनेत पीककर्ज वाटपात वाढ
जिल्हा बँकेकडून १०२ कोटींचे पीककर्ज वाटप

नाशिक । प्रतिनिधी

येणार्‍या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्जवाटपास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत उद्दिष्टाच्या 19 टक्के म्हणजेच 102 कोटी 11 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.गतवर्षी दि.21 मेपर्यंत जिल्हा बँकेतर्फे अवघे तीन कोटी 16 लाख रुपये इतकेच पीक कर्जवाटप करण्यात आले होते.त्या तुलनेत यावर्षी पीककर्ज वाटपात मोठी वाढ झाली आहे.

शेतकर्‍यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकतर्फे जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांना कर्जपुरवठा करते. या संस्था सभासद शेतकर्‍यांना पीक कर्ज पुरवठा करतात; मात्र गेल्या काही वर्षांत अनेक विकास संस्था मोठ्या प्रमाणात थकबाकीदार झाले . गेल्या वर्षी जिल्हा बँकेला महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची रक्कम जिल्हा बँकेला मिळाली होती; मात्र या कर्जमुक्ती योजनेस अपात्र ठरलेल्या शेतकजयांनी अद्याप कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 417 विकास संस्था अनिष्ट तफावत यादीत गेल्या आहेत.

जिल्हा बँक या अनिष्ट तफावतीमध्ये गेलेल्या संस्थांना कर्जपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे या यादीतील संस्थांचे सभासद असलेल्या व नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना थेट कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्हा यंत्रणेने यंदा जिल्हा बँकेला 535 कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. बँकेने आतापर्यंत थेट 250 शेतकजयांना 1 कोटी 1 लाख रुपये पीक कर्जपुरवठा केला आहे. संस्थात्मक व थेट पद्धतीने बँकेने आतापर्यंत 11 हजार 455 यांना 102 कोटी 11 लाख रुपये पीक कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे.

करोनासारख्या गंभीर काळातही शेतकरी कृषी माल उत्पादित करत असून, मालाची विक्री होण्यात सतत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकजयांना उत्पादन खर्चदेखील मिळत नसल्याने ते कर्जबाजारी होत आहेत. त्यात नाशिक जिल्हा बँक अडचणीत असल्याने हक्काचे पीककर्ज मिळणेही दुरापास्त झाले आहे. 2020-21 च्या पीककर्ज वाटपासाठी 4 हजार 724 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात 2 हजार 967 कोटी रुपयांचे वाटप झाले.

यंदा 2021-22 मध्ये कर्जवाटपामध्ये 35 टक्के घट करून, केवळ 2 हजार 780 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. बँकांच्या किचकट नियमावलीमध्ये शेतकजयांना पीककर्जासाठी सावकारांचे पाय धरण्याची नामुष्की येणार आहे. या कपातीविरोधात किसान सभा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. शेतकजयांना अधिकाधिक पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, विजय दराडे, नामदेव बोराडे, किरण डावखर, प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com