नायलॉन मांजा विक्री केल्यास थेट तडीपारची कारवाई; शहरातून एकूण 'इतके' जण तडीपार

नायलॉन मांजा विक्री केल्यास थेट तडीपारची कारवाई; शहरातून एकूण 'इतके' जण तडीपार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बंदी (ban) असलेला नायलॉन मांजा (Nylon Manja) शहरात विक्री (sale) होत असल्यामुळे अनेक अपघात (accidents) घडत आहे त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी (police) कारवाई सुरू केली असून आता थेट तडीपारची देखील कारवाई होत आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. आतापर्यंत शहरातून एकूण दहा जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील सहा मांजा विक्रेत्यांना तडीपार केल्यानंतर आणखी काही नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई (Strict action) करीत सोमवारी आणखी १० जणांना तडीपार केले आहे

त्याचप्रमाणे मांजा विक्रेत्यांसह गंभीर स्वरुपातील गुन्ह्यांमधील संशयितांविरोधात कठोर भूमिका घेतली असून आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल असून एकूण १६ विक्रेत्यांना तडीपार करण्यात आले आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या (Panchvati Police Station) हद्दीत दोन विक्रेते सातत्याने नायलॉन मांजा विक्री करत असल्याची नोंद घेत, त्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड तपासून प्रवीण मोरे (३०) आणि शुभम धनवटे (वय १९) या दोघांना तडीपार करीत आयुक्तालय हद्दीत वास्तव्यास १५ दिवसांची मनाई करण्यात आली आहे.

संक्रांतीच्या काळात हे दोघे मानवी व पक्ष्यांच्या जीवितास घातक असलेला नायलॉन मांजाची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com