Video : वीर जवान अमर रहे! दिंडोरीतील जवानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी (Dindori) येथील रहिवासी असलेले जवान प्रसाद कैलास क्षीरसागर (prasad kailas kshirsagar) (24) या सैन्य दलातील जवानास अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) देशाचे वीरमरण आले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली आहे. आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले....

दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षिरसागर हे भारतीय सैन्य दलात होते सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सोमवार दि. 14 रोजी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सैनिकी ट्रकद्वारे आपल्या सहकार्‍यांसोबत सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात आई वडील बहीण व भाऊ असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचेवर होती. जानेवारीत ते सुट्टीवर आलेले होते. सुट्टी संपून 30 जानेवारीला त सेवेसाठी रुजू होण्यासाठी रवाना झाले होते.

आज सकाळी शहीद क्षरसागर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी टेलिफोनकॉलनी उमराळे रोड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरापासून अंतिम यात्रेला सुरवात झाली. टेलिफोन कॉलनी उमराळे रोड फाटा मार्गे कै.पोपटराव जाधव कार्यकारी सोसायटी जवळून मारुती मंदिर, राजेश्वर गल्ली, पालखेड रोड, पालखेड चौफुली वरून सीड फार्म या मैदानावर नेण्यात आली. याठिकाणीच अंत्यसंस्कार पार पडले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com