ग्रीन जिमवर समाजकंटकांची वक्रदृष्टी

ग्रीन जिमवर समाजकंटकांची वक्रदृष्टी

नाशिक । रवींद्र केडिया

नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, त्यांना शासनाच्या माध्यमातून व्यायामाची साधने उपलब्ध व्हावीत या सूत्रावर आधारित ग्रीन जीम ही संकल्पना पुढे आली. आज शहरातील प्रत्येक उद्यानामध्ये ग्रीन जीम साहित्य बसवल्याचे दिसून येते. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची वाताहत झाल्याचे चित्र आहे.तसेच, समाजकंटकांचीही या ग्रीन जिमवर वक्रदृष्टी असून त्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

कामगार वसाहत म्हणून ओळख असलेल्या सातपूर परिसरातही आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जॉगिंग उद्यान परिसरात ग्रीन जीम उभारण्यात आले आहेत. या ग्रीन जिमच्या माध्यमातून उद्यानात येणार्‍या नागरिकांना शरीर स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण झाली आहे.

शासनाचा हेतू हा सर्वसामान्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या सुविधांचा वापर करताना नागरिकांनी आपली मालमत्ता समजून जपून हाताळणी करणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांशी ग्रीन जिमची स्थिती ही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

मात्र, बहुतांश कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ग्रीन जिमची समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. प्रशासनाकडून देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याने छोट्या तुटफुटीचे परिवर्तन निकृष्ट झालेल्या साहित्यांमध्ये परावर्तीत झाले आहे.अनेक उद्यानांमध्ये साहित्य तुटलेल्या अवस्थेत उभे आहेत.काही ठिकाणी संपूर्ण साहित्य उखडून पडले आहे.ग्रीन जिमच्या तुटक्या साहित्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

समाजकंटकांना आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने देखील अशा दुष्ट प्रवृत्तींवर विशेष पाळत ठेवणे गरजेचे आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे

मधुकर देवरे, सामाजिक कार्यकर्ता

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com