Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याDigital India Week 2022 : वावीतील युवकाशी पंतप्रधानांचा संवाद

Digital India Week 2022 : वावीतील युवकाशी पंतप्रधानांचा संवाद

वावी । वार्ताहर Vavi

गुजरात ( Gujrat ) येथील गांधीनगर ( Gandhinagar) येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘डिजिटल इंडिया विक 2022’ (‘Digital India Week 2022’) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वावी येथील दिव्यांग रवींद्र सुपेकर ( Ravindra Supkar, Vavi ) यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

तंंत्रज्ञानाची सुलभता वाढवणे, जीवनातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी व स्टार्टअपला चालना देण्यासाठी सेवा वितरण सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने डिजिटल इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचा थीम ‘कॅटलायझिंग न्यू इंडियाजकडे’ आहे. सिएससी ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश पाटणकर, वावी येथील व्हिएलई दिव्यांग रविंद्र सुपेकर व दिल्ली येथील सुबोध मिस्त्रा या सप्ताहात सहभागी झाले असून पंंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या समवेत काही निवडक तंत्रज्ञान विभागास भेटी दिल्या .

या कार्यक्रमाद्वारे डिजिटल इंडियाचा वर्धापन दिन, आधार, यूपीआई, कोविन, डिजिटल लॉकर इत्यादी सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मने नागरिकांचे जीवन सुलभ कसे केले आहे हे यामार्फत दाखवण्यात आले. विविध भागधारकांसोबत सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधेल असा आशावाद यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. यासाठी सीएससीचे वैभव देशपांडे व समीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सुपेकर यांचे कौतुक

बँकिंग क्षेत्रातील प्रधानमंत्री जन-धन योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना कसा झाला याविषयी सुपेकर यांनी सखोल माहिती देताच मोदी यांनी सीएससी विभागात येत सुपेकर यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सीएसी अकॅडमी मार्फत सुरु असलेले शैक्षणिक प्रकल्प, डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करुन शैक्षणिक संधी, ऑलिम्पियाड विभागातून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी केली जाते हे सुपेकर यांनी मोदी यांना सांगितले. सीएससी बालविद्यालय, ग्रामीण डिजिटल साक्षरता, ग्रामीण इ-स्टोअर, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शेतकर्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या सीएससी एफपीओबद्दल मोदी यांनी माहिती जाणून घेत सुपेकर यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या