कोटींच्या भूसंपादनाची मनपाला गरज होती का?: भुजबळ

कोटींच्या भूसंपादनाची मनपाला गरज होती का?: भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) 2800 कोटींचे दायित्व आहे. त्यात फक्त भूसंपादनाचे (Land acquisition) आठशे कोटी रुपये आहेत. आर्थिक बेशिस्तीमुळे मनपावर कर्जाचा बोजा झाला आहे.

भूसंपादनावर 800 कोटी खर्चून त्या जमिनीचा काय उपयोग केला असा प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित करून ट्रांजेक्शन (Transaction) झाले आहे, त्याची संपूर्ण चौकशी होणार असल्याचे सांगितले. यामुळे या संपूर्ण प्रकरणात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळात काय सत्य बाहेर येते याकडे लक्ष लागले आहे.

आज (दि. 25) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत येऊन सुमारे चार तास महापालिकेच्या विविध कामांचा विभागनिहाय आढावा (Section wise review of works) घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी होते. ना. भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या चुकीच्या कामांबद्दल टीका करत चौकशीचे आदेश दिले.

त्याचप्रमाणे मागील काही काळात ठेकेदारी पद्धती जास्त वाढल्यामुळे देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने काही कामांची जबाबदारी घ्यावी, सर्व गोष्टी बाहेर देऊन चालणार नाही, अशी सूचना देखील त्यांनी केली. दरम्यान, म्हाडा (MHADA) प्रकरणात पूर्वीच्या आयुक्तांवर डाग लागला आहे.नवीन आयुक्तांनी भूसंपादनासह अनावश्यक कामात कुणाचे हित दडलेले आहे, हे शोधून काढावे. असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिले.

भुजबळ यांनी महापालिकेतील आर्थिक बेशिस्तीचा पाढा वाचला. मी मुंबईचा महापौर राहिलो आहे. विकासकामांच्या साधारण दीड पट इतके कर्ज गृहीत धरले जाते. पण इथे अडीच ते तीन पट कर्ज त्यावर व्याज याचा विचार केला तर महापालिकेचा गाडा आर्थीक दृष्टचक्रात रुतणार आहे. म्हणून हे गंभीर आहे. त्यात 800 कोटी भुसंपादनावर (Land acquisition) खर्च अनाकलनीय आहे. आता तरी भूसंपादन खर्च थांबवा एवढा भुर्दंड सोसून संपादीत जमिनीचा काय वापर केला हेही लोकांपुढे आणले पाहिजे. ज्यांच्या करातून हा भुर्दंड सोसला त्यांना त्याची माहिती मिळणे गरजेचे आहे,असे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

नंदिनी नदीला नाल्याचे रुप

गोदावरी नदीपात्रात सांंडपाण्याचे नाले सोडले आहेत. मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) असूनही सांडपाणी नदीत मिसळते ती कामे त्वरुीत करावीत. पाणीपुरवठ्यांच्या कामाचा आढावा घ्यावा. रुग्णालयात करोना काळात कोट्यवधीचा खर्च केला पण सध्या अनेक यंत्र बंद पडले आहेत. त्यामुळे आउट सोर्सींग करुन सीएसआर फंडातून रुग्णालयाची कामे सुरु करा. नंदिनी नदीला नाल्याचे रुप आले आहे, त्यात लक्ष घालावे, असे निर्देश महापालिका आयुक्तांना भुजबळ यांनी दिले.

2 पैकी एक पूल रद्द

नवीन नाशिक भागात महापालिकेच्या वतीने दोन उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. या कामाची खरी गरज आहे का? याबाबत उंटवाडी भागातील एका कामाची वर्क ऑर्डर दिली आहे. पण दुसर्‍याचे काम मात्र थांबविले आहे, असे सांगत दादासाहेब फाळके स्मारकाचे काम खासगी संस्थेला देण्याचे थांबविले आहे. इतरही अनेक अनावश्यक कामे स्थगित करणार असल्याचे प्रशासक रमेश पवार यांनी सांगितल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.