मोठी बातमी : धुळे, नंदुरबारसह पाच जिल्हा परिषद पोटनिवडणुकांना स्थगिती

मोठी बातमी : धुळे, नंदुरबारसह पाच जिल्हा परिषद पोटनिवडणुकांना स्थगिती
धुळे जिल्हा परिषद

मुंबई

राज्यातील ५ जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर आज या निवडणुकांना स्थगिती मिळाली.

धुळे जिल्हा परिषद
ई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार

न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद; तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान; तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालाने ४ मार्च २०२१ रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणूका तात्काळ प्रभावाने रद्दबादल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला होता.

या निवडणुका रद्द करण्यास आयोगाने नकार दिल्यानंतर, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.राज्य शासनाशी सल्लामसलत करून राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा असा आदेश ६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर आज प्रदीर्घ चर्चा झाली आणि निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषद आणि आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्या पोटनिवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com