Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे- नंदूरबार विधान परिषद : अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड

धुळे- नंदूरबार विधान परिषद : अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड

धुळे- नंदूरबार विधान परिषदेच्या (dhule nandurbar mlc election)निवडणूक बिनविरोध झाली. भाजपचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल (Amrishbhai Patel) आणि महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी (Gaurav Wani) यांच्यात लढत होईल अशी शक्यता होती. मात्र गौरव वाणी यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

- Advertisement -

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून गौरव वाणी यांना उमेदवार दिली. परंतु गौरव वाणी यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

…यामुळे झाली धुळे- नंदुरबार बिनविरोध

विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC election) अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत (Kolhapur MLC Election) भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे (BJP Candidate Amal Mahadik withdraw application) घेतला आहे. यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील (Congress Satej Patil won unopposed) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. धुळे- नंदुरबार आणि मुंबई या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूर विधान परिषदेची जागा सोडली आहे. या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापुरची जागा सोडली.

भारतीय जनता पार्टीची मतदार संख्या 199 इतकी आहे. महाविकास आघाडीची मतदार संख्या कमी झाली आहे. महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या धडगाव आणि साक्रीमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यानं महाविकास आघाडीची 34 मत कमी झाली आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी सोपी होती. परंतु आता गौरव वाणी यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

धुळे-नंदुरबार पक्षीय बलाबल

भाजप……….199

काँग्रेस……….136

राष्ट्रवादी………20

शिवसेना……..20

एमआयएम……09

समाजवादी…….04

बसप………….01

मनसे………….01

अपक्ष………….09

एकूण………….399

- Advertisment -

ताज्या बातम्या