धुळे, अहमदनगर मनपाची पोटनिवडणूक जाहीर

धुळे, अहमदनगर मनपाची पोटनिवडणूक जाहीर

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (Municipal by-election) 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक (Maharashtra Election Cmmission) आयुक्त यू. पी. एस. मदान (U P S Madan) यांनी केली आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे.

धुळे, अहमदनगर मनपाची पोटनिवडणूक जाहीर
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 (5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.)

7 डिसेंबर 2021 नामनिर्देशनपत्रांची छाननी

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर

निवडणूक चिन्हे वाटप 10 डिसेंबर 2021

21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान

मतमोजणी 22 डिसेंबर 2021

धुळे, अहमदनगर मनपाची पोटनिवडणूक जाहीर
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे :

धुळे- 5 ब

अहमदनगर- 9 क

नांदेड वाघाळा- 13 अ

सांगली मिरज कुपवाड- 16 अ.रा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com