नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिस २३ रुग्ण, धुळ्यातील संख्या शून्यावर

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिस २३ रुग्ण, धुळ्यातील संख्या शून्यावर
USER

मुंबई

करोनापाठोपाठ आलेल्या म्युकरमायकोसिस (mucormycosis)आजाराचे संकट हळूहळू निवळत आहे. उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे (mucormycosis)५१ रुग्ण असून त्यात सर्वाधिक २३ रुग्ण नाशिकमध्ये (nashik)आहे. उत्तर महाराष्ट्रातील (north maharashtra) पाच जिल्ह्यांपैकी धुळे (dhule)जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. राज्याचा आरोग्य विभागाने (helth department)धुळे जिल्हा म्युकरमायकोसिस मुक्त घोषित केला आहे.

आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १३४५ म्युकरमायकोसिसचे रुग्ण होते. त्यातील एकट्या नाशिक जिल्ह्यात ७६३ रुग्ण होते. त्यानंतर नगरमध्ये (ahmednagar) धुळ्यात १०२ रुग्ण होते.

म्युकरमायकोसिने उत्तर महाराष्ट्रातील १४२ जणांचा बळी घेतला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसने ८२, जळगावात (jalgaon)३०, अहमदनगरमध्ये २४, धुळ्यात ६ जणांचा मृत्यू झाला. नंदुरबारमध्ये (nandurbar) एकाही जणाचा मृत्यू झालेला नाही.

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिस २३ रुग्ण, धुळ्यातील संख्या शून्यावर
धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण

नाशिक जिल्ह्यात करोना विषाणूचा उपद्रव सुरू असतानाच साधारणत: एप्रिल-मे महिन्यात काळ्या बुरशीनेदेखील डोके वर काढले. काळ्या बुरशीमुळे म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार होतो. हा आजार नवीन नसला, तरी एरवी दर वर्षी जिल्ह्यात या आजाराचे बोटांवर मोजण्याइतके रुग्ण आढळतात. परंतु, करोना संकटकाळात शहर आणि जिल्ह्यातील कान, नाक, घसातज्ज्ञांकडे या आजाराच्या रुग्णांची रांग लागली. आजाराचे निदान उशिराने झाल्याने या बुरशीने अनेक रुग्णांच्या विविध अवयवांचा ताबा घेतला. त्यामुळे सुमारे पाचशे रुग्णांना दात, जबडा, नाकातील काही भाग, इतकेच नाही तर डोळ्यांसारखे अवयवदेखील गमवावे लागले. मोठ्या शस्त्रक्रिया करून हे अवयव काढावे लागले. ज्या रुग्णांच्या मेंदूपर्यंत बुरशी पोहोचली त्यांचा मृत्यू झाला. अशा ८२ रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत एकूण ७६२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २८ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यातील १८ रुग्ण शहरात उपचार घेत असून, एक रुग्ण मालेगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिस २३ रुग्ण, धुळ्यातील संख्या शून्यावर
सप्तशृंगीदेवीचे दर्शन ऑनलाईन पासनंतरच, जाण्यापुर्वी वाचा ही नियमावली

काळी बुरशी हा काय प्रकार आहे?

म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

सर्वाधिक धोका कोणाला?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

काळ्या बुरशीची लक्षणे

काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.

बचाव कसा करायचा?

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा

तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

Related Stories

No stories found.