Friday, May 10, 2024
Homeधुळेदुहेरी निर्घुण खुनाने धुळे जिल्हा हादरला

दुहेरी निर्घुण खुनाने धुळे जिल्हा हादरला

दोंडाईचा dondaicha । श.प्र

शहरातील नंदुरबार रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये (hotel) कामगाराचा (worker) धारदार सुर्‍याने भोसकून निर्घुण खून (Murder by stabbing) केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयीताला पाळधी (जि. जळगाव) येथून ताब्यात घेतले आहे. तर शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गवरील लालमाती पॉईन्ट ते खंबाळा गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला पालापाचोळ्यात इसमाचा मृतदेह (dead body) आढळल्याने खळबळ उडाली

- Advertisement -

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

नंदुरबार रोडवर विद्युत कॉलनीसमोर पुष्पा हॉटेल असून सागर निवाणे हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून घरी गेले. हॉटेलमध्ये स्वयंपाकी नरेश लालचंद साहू (वय 54), गणेश कोळी व एक वेटर हे झोपले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास नरेश साहू व गणेश कोळी यांच्यात हॉटेलमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला.

त्यावेळी गणेश कोळी याने नरेश साहू यास धारदार सुर्‍यानेे पोटात भोसकले. तसेच पाठीवर वार करून त्याचा खुन केला. त्यानंतर नरेश साहू हा हॉटेलमध्ये पहिला खोलीत रक्ताचे थारोळ्यात पडलेला होता. तसेच गणेश कोळी याने रनजीत मानकर्‍या पावरा यास कोणाला काही बोलला तर तुला मारून टाकेल, अशी धमकी देवून तेथून पळून गेला. अशी हकीकत सकाळी आठ वाजता रनजीत पावरा याने हॉटेल चालक सागर निनावे यांना सांगितली.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदाVISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

त्यानंतर निनावे यांनी दोंडाईचा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच प्र.उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर, दोंडाईचा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे, दिनेश मोरे, आदींसह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच धुळे येथील श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. एपीआय योगेंद्र राजपुत, एएसआय धनंजय मोरे, प्रशांत माळे, फॉरेन्सिक लॅबचे पी.व्ही.मोरे, विजय अहिरे यांनी पाहणी केली. घटनास्थळी रक्ताने माखलेला सुरा मिळून आला.

याप्रकरणी सागर नानावे यांच्या फिर्यादीवरून गणेश कोळी (रा. पाळधी ता.धरणगाव जि. जळगाव) यांच्याविरोधात भांदवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

पालापाचोळ्यात आढळला अनोखळी मृतदेह, गुन्हा दाखल

शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गवरील लालमाती पॉईन्ट ते खंबाळा गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला पालापाचोळ्यात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अज्ञात इसमांनी त्याचा गळा आवळून तसेच डोक्यावर व शरिरावर जखमा करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकुन दिल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी अज्ञातांवर शिरपूर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील लालमाती ते खंबाळादरम्यान आज दि. 9 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. पाळापाचोळ्यामध्ये हा मृतदेह पडलेला होता. मृताचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून याबाबत पोलिस पाटील मांगीलाल पावरा यांनी शिरपूर तालुका पोलिसांना कळविले. माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पहाणी केली.

मयत इसमाच्या मानेजवळ गळा आवळल्याचे व्रण तसेच डोक्यावर आणि शरिरावर जखमा दिसून आल्या. त्यावरून त्याचा अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी गळा आवळून तसेच डोक्यावर व इतर शरिरावर जखमा करुन खून केल्याचे दिसून आले. तसेच त्याची ओळख पटवू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकुन दिला. अज्ञात इसामांविरुध्द मांगिलाल पावरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या