ढोल बंद, आता मनपा कडून वसुलीसाठी 'ही' मोहीम

ढोल बंद, आता मनपा कडून वसुलीसाठी 'ही' मोहीम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

थकीत घरपट्टी वसूलीसाठी ( House Tax ) महापालिकेने ( NMC ) ऑक्टोबरमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्तांसमोर ढोल वादन केले. त्यातून मनपाच्या तिजोरीत जबळपास पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक भर पडली. या मोहिमेस विरोधही झाला. त्यामुळे महापालिकेने ढोल वादन बंद करून आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ३० मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळ, घरपट्टीची जवळपास तीनशे कोटींची थकबाकी, यामुळे गत दोन वर्षात महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. तर शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने विविध सेवा पुरवण्यासाठी निधीची गरज वाढत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेली घरपट्टीची वसूली करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहेत.

घरपट्टीत सुट देणे, आवाहन करणे, नोटीसा पाठवणे आदी उपाय झाल्यानंतर १ लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये या मोहिमेतून ५ कोटी ३४ लाख रुपयांची वसूली झाली. मात्र, या मोहिमेस विरोध देखील झाला. त्यामुळे महापालिकेने ढोल वादन मोहिम बंद करून आता पुन्हा मालमत्ता जप्त करत त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुर्वी थकबाकीदारांना नोटीस पाठवून २१ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत प्रतिसाद न देणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील. पहिल्या टप्यात ३० मालमत्तांची यादी तयार करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com