
नाशिक । प्रतिनिधी Nashik
थकीत घरपट्टी(House Tax Arrears ) वसुलीसाठी ढोल बजाओ मोहीमेला('Dhol Bajao Campaign' ) मनपा आयुक्तांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या एक मार्चपासून शहरातील सहाही विभागात थकबाकीदारांच्या घरासमोर पुन्हा ढोल वाजवला जाणार आहे.
आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापुर्वी अवघा एक महिना उरला असून मामलत्ता कर वसूल करणे करसंकलन विभागापुढे मोठे आव्हान आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात करसंकलन विभागाने ढोल बजाओ मोहीमेचे अस्त्र उगारले होते. तीन महिने चाललेल्या या मोहीमेत तब्बल दहा कोटींच्या आसपास थकबाकी वसूल झाली होती.