Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल, डिझेल का वाढत आहे, पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले उत्तर...

पेट्रोल, डिझेल का वाढत आहे, पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले उत्तर…

नवी दिल्ली:

देशातपेट्रोल-डिझेलचे भाव उच्च स्तरावर आहेत. देशातील काही शहरात शंभरीच्या जवळपास दर पोहचले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत या प्रश्नाचे उत्तर दिले.

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे खासदार विशंभर प्रसाद निषाद यांनी पेट्रोलियम मंत्र्यांना राज्यसभेत विचारले ‘सीता मातेची धरती नेपाळमध्ये पेट्रोल, डिजल भारतापेक्षा स्वस्त आहे. रावणाच्या लंकेत भारतापेक्षा त्याची किंमत कमी आहे. मग रामाच्या देशात पेट्रोल, डिझेल महाग का?

यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ विक्रीवर होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ६१ डॉलर प्रति बॅरल झाले आहे. यामुळेच देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले आहेत. परंतु हे दर ऑल-टाइम हाय आहे, असे नाही. मागील ३०० दिवसांत ६० दिवस पेट्रोल वाढले तर सात दिवस त्याचा किमत कमी झाली.

इतर देशांशी भारताची तुलना करणे चुकीचे असल्याचे प्रधान यांनी सांगितले. ते म्हणाले, नेपाळमध्ये रॉकेल ५९ रुपये तर श्रीलंकेत ५७ रुपये आहे. भारतात त्याची किमत ३२ रुपये लिटर आहे.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या