Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याउपराष्ट्रपती पदासाठी धनकड एनडीएचे उमेदवार

उपराष्ट्रपती पदासाठी धनकड एनडीएचे उमेदवार

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ( Vice President Election) एनडीएकडून शेतकरी परिवारातील सुपुत्र जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सध्या धनकड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.

- Advertisement -

शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Prime Minister Narendra Modi) उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनकड यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यास मतदानाची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपतीही सर्वसहमतीने बिनविरोध निवडला जाऊ शकतो. मात्र याची शक्यता कमीच दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या