Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराजीनाम्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई:

विवाहबाह्य संबंधांची कबुली दिल्यानंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडे राजीनामा देणार का याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आता भाजप नेत्यानेच धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिल्याविरोधात तक्रार केल्याने भाजपची गोची झाली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर वृत्तवाहिनीवर बोलतांना प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते किरिट सोमय्या, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर यांनी केली तर दुसरीकडे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आंबोली पोलिसात तक्रार केली आहे. “रेणू शर्मा ही महिला हनी ट्रॅपिंग करते. ती मलाही जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात होती”, असे पत्र माजी आमदार आणि आता भाजपत असेलेले नेते कृष्णा हेगडे यांनी थेट मुंबई पोलिसांना दिले आहे.

राजीनाम्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. या विषयावर मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पुर्ण बाजू मांडली आहे. राजीनाम्यासंदर्भात ते आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे ते म्हणाले,.

शुक्रवारच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एक बैठक झाली. बैठकीनंतर प्रफुल पटेल शरद पवार यांच्या भेटीला गेले. सिल्व्हर ओकवरती शरद पवार आणि प्रफुल पटेल चर्चा झाली आहे. त्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीतच धनंजय मुंडेंचे भवितव्य ठरणार आहे.

‘व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर…

धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या महिलेचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. संबंधित मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा माझ्या अशीलावर जो आरोप केला जातोय, तो खोटा आहे. माझ्या अशीलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून दागिने विकून ती स्वत:ची गुजराण करतेय. तिच्यावरील ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंड बंद होतील. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी या गोष्टी उघड करु शकत नाही” असे रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या