Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजवाहर संस्थेवरून धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाले...

जवाहर संस्थेवरून धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई | Mumbai

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या जवाहर एज्युकेशन संस्थेवर (Jawahar Education Society) बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं या सोसायटीवर वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण आमने-सामने आले आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत पॅनल उभा करत पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलं आहे.

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचाराच्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांची काय अवस्था आहे? त्यांच्या पॅनलची काय अवस्था आहे? कशासाठी ते निवडणूक लढले? मुंडे साहेबांची संस्थेसंदर्भातील स्वप्न त्यांच्यासोबतच गेली. बारा वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक होतं आहे.

वैद्यनाथ प्रभूचं नाव आणि भ्रष्टाचार यामुळे मी निवडणुकीत उतरलो असून मला माझ्या लोकांना मोठं करायचं असल्याने ही निवडणूक प्रामाणिक भक्तांच्या अस्मितेची आहे. या नावाला कलंक लागणार नाही याची काळजी मी घेणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.

धक्कादायक! क्रिकेट खेळताना अवघ्या १४ वर्षाच्या चिमुरड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

यावेळी या निवडणुकीतील उमेदवार, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्यापारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान परळी बाजार समिती निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत होत असून मुंडे बहीण भावासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या