धनंजय चंद्रचूड देशाचे ५०वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ

धनंजय चंद्रचूड देशाचे ५०वे सरन्यायाधीश; राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली | New Delhi

देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित (Uday Lalit) यांचा कार्यकाळ संपल्यानंनतर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश (Chief Justice) म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला...

धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करणार असून १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली होती. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद (Babri Masjid) तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे.

दरम्यान, याआधी धनंजय चंद्रचूड यांनी बॉम्बे उच्च न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायदान केले आहे. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात विकिली केलेली आहे. याशिवाय अभ्यात प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात (Mumbai University) अध्यापन केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com