Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रAccident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण...

Accident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण गंभीर जखमी

शेगाव | Shegaon

पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा परतीच्या प्रवासावेळी मोठा अपघात झाला आहे. आज (२२ मे) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

- Advertisement -

या अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले आहेत. तर ७ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी शेगावातील काही भाविक गेले होते. परतत असताना भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.

या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर ७ भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे.

भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

वाहनचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काल (२१ मे) रात्रीपासून भाविकांचा हा प्रवास सुरु होता. भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

- Advertisment -

ताज्या बातम्या