चैत्रोत्सवात सप्तशृंगी गडावर भाविकांची रीघ

यात्रेवर 256 सीसीटीव्हींची नजर
चैत्रोत्सवात सप्तशृंगी गडावर भाविकांची रीघ

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Garh

गडावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास गुरुवारपासून (दि. 30) प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविक, भक्तांची मोठी रीघ गडावर होती. 256 सीसीटीव्ही यात्रेवर नजर ठेवून आहे.

सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सपत्नीक देवीची पंचामृत महापूजा केली. यावेळी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री वर्धन पी. देसाई यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ट्रस्ट विश्वस्तमंडळ उपस्थित होते.

चैत्रोत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेमार्फत अन्नपूर्णा प्रसादालयात मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. भगवती मंदिर भाविकासाठी 24 तास खुले करण्यात आलेले आहे. गैरसोय होऊ नये, या दृष्टीने माहिती कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच एकूण 256 सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यांची भाविकांवर नजर ठेवून आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

महाराष्ट्र सुरक्षा बल, सुरक्षा रक्षकांसह, महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी यांचा बंदोबस्त आहेत. आपत्ती निवारणासाठी 24 तास अग्निबंब सुविधा व प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच विविध ठिकाणी हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. उत्सवकाळात अचानक उद्भवणार्‍या आपत्ती व्यवस्थापनासाठी व मदतकार्य प्रक्रियेसाठी 1800 2334 067, 02592 253350 टोल फ्री क्रमांकाची सुविधा ट्रस्टतर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँण्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

चालू वर्षी भाविकांच्या निवार्‍याचे सोईसाठी शिवालय तलाव परिसरात निवारा शेड उभारण्यात आलेला आहे, उत्सव कालावधीत गर्दीच्या नियोजनाकरिता सुरक्षारक्षक, सुरक्षा बल, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी वर्गाचे उत्सव पूर्व मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आहे.

मुखदर्शनाची सुविधा

तसेच चालू वर्षापासून भगवती मंदिरात भाविकाना सुलभ दर्शनासाठी भगवतीच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच भाविकांच्या सोईसाठी फ्यूनिक्युलर रोपवे प्रकल्प येथील विश्वस्त संस्थेचे देणगी व चौकशी कार्यालय, लाडू काउंटरचे जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलाणी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त अ‍ॅड.ललित निकम, विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, नानाजी काकळीज भिकन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, विवेक बेणके, नर्मल डांगे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com