Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविकांचा उत्साह; बम बम भोलेच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी

Video : ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविकांचा उत्साह; बम बम भोलेच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar |प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (Corona) बंद असलेली ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा (brahmagiri procession) यावर्षीपासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकमध्ये भाविकांची काही प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते….

- Advertisement -

मात्र आज तिसरा श्रावण सोमवार (Shravan Monday) असल्याने लाखो भाविक प्रदक्षिणेकरिता आले असून त्र्यंबकनगरी (Trimbakeshwar) बम बम भोलेच्या नाम घोषणाने दुमदुमली आहे. तसेच कुशावर्त कुंडावर भाविकांनी स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

काल सायंकाळपासूनच त्र्यंबकमध्ये भाविकांची (Devotees) गर्दी (crowd) होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळपासून भाविकांनी प्रदक्षिणा मारण्यासाठी गर्दी केली आहे. तसेच प्रदक्षिणेचे रस्ते (Road) भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. याशिवाय प्रदक्षिणेच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त (Police Arrangements) देखील तैनात करण्यात आला आहे.

तर काही ठिकाणी विविध सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी फराळाचे वाटप (Distribution of snacks) करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही भाविकाला आरोग्याची समस्या जाणवू लागल्यास प्रशासनाकडून रुग्णवाहिका व गोळ्या औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने (Administration) कालपासून नाशिकहून (Nashik) त्र्यंबककडे येणाऱ्या खाजगी वाहनांना (Private Vehicles) प्रवेश बंद केला असला तरी त्र्यंबक शहरात मात्र रस्त्यालगत चारचाकी वाहने पार्किंग केल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही प्रमाणवर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच भाविकांना देखील पायी चालताना दाटीवाटीतून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या