भाविकांच्या गाडीला अपघात : ३ ठार १५ गभीर जखमी

 भाविकांच्या गाडीला अपघात : ३ ठार १५  गभीर जखमी

दिपक सुरोसे 

शेगाव Shegaon

 पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी (vehicle of devotees) गेलेल्या शेगांव तालुक्यातील  भाविकांच्या वाहनाला परतत असताना   दि.२२ मे रोजी  पहाटे ६ चे सुमारास अपघात (accident) झाला.  जमजम नगर समोर क्रुझर  गाडी क्रं. एम.एच-२७, जी,६१०४  ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये दोन महीला व एक पुरूष असे ३ भाविक जागीच (killed) ठार तर १५ भावीक गंभीर जखमी (seriously injured) झाले आहेत.

 नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. या अपघातात सुनंदा झाल्टे, शुभांगी सागर झाल्टे,रा.तरोडा-डि, परशुराम गजानन लांजुळकर,रा.आळसणा हे तिघेजण ठार झाले.

तर कामिनी हरिदास भारंबे (२४),प्रमिला पाटील (४३), जिजाबाई भारंबे (४०), शितल भारंबे (३०), पूर्वा नितीन ठाकरे (२३), प्राजल दत्तात्र्य पारस्कर (२०), सागर विलास झोड (३०),ज्योती ज्ञानेश्वर भारंबे (२३), ज्ञानेश्वर वसंतराव भारंबे (२९), अक्षय भारंबे (३८),नितिन ठाकरे (३९), योगीराज झाल्टे (२१), श्लोक ठाकरे (१३),ओवि भारंबे ,सार्थक भारंबे ,सर्व राहणार मच्छिंद्रखेड हे १५  जन गंभीर जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते. रात्री पासून हा प्रवास सुरु होता.

वृत्त लिहिस्तवर शेगांव शहर पो.स्टे.मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.जखमी पैकी तिघाची प्रकृती चिंताजनक आहे. 

मच्छिंद्रखेड, तरोडा डी येथील भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनाहंन घराकडे परतले असता शेगाव जवळ वाहनाचा अपघात झाला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com