गडावर 7 ऑक्टोंबरपासून होणार देवीदर्शन

गडावर 7 ऑक्टोंबरपासून होणार देवीदर्शन

नांदूरी । वार्ताहर Nanduri

सहा महिन्यांनंतर राज्यातील मंदिरे 7 सप्टेंबर शारदीय नवरात्रोत्सवापासून (Navaratrostav) उघडण्यास सरकारने परवानगी दिल्याने साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावरील (Saptashringigada) ग्रामस्थांसह नांदुरी (Nanduri) येथिल व्यवसायीकांसह आदिमायेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेचे मंदिर (Saptashrungi Mother) कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर एक मार्चपासून भाविकांना बंद करण्यात आली होती. तेव्हापासून मंदिर बंदच (Temple closed) असल्यामुळे एप्रिल महिन्यातील आदिमायेचा वर्षातील प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव यात्राही रद्द करण्यात आली. रद्द करण्यात आली होती. मागील वर्षीही मार्चमध्येच कोविडच्या पहिल्या लाटेत मंदिर बंद करण्यात आले होते.

कोविडच्या दुसर्‍या’ लाटेत ही एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांना सलग तीन यात्रोत्सवांना मुकावे लागले होते. या कालावधीत शेकडो वर्षांची असलेली पदयात्रा (Padyatra), पालखी यात्रा (Palkhi Yatra), कावड यात्रेची (Kawad Yatra) परंपरा खंडित झाल्याने भाविकांच्या मनातील हरहुर कायम होती. दरम्यान दुसरीकडे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या सप्तशृंगीगडासह नांदुरी येथिल व्यवसायीकांसह वाहनधारकांची सर्व अर्थव्यवस्थाही

भाविक व पर्यटकावरच (Devotees and tourists) अवलंबून असल्याने या कालावधीत झालेल्या यात्रोत्सावात गडावर एकही भाविक येऊ न शकल्याने गडावरील सर्व अर्थचक्र थांबले होते. सुमारे तीनशेच्यावर छोटे मोठे व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असलेले कामगार व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान उत्पन्न देणारे तीन महत्त्वाचे उत्सव हातातून गेले असले तरी 7 सप्टेंबरला आदिमाया सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवापासून मंदिर उघडणार असल्याने नांदुरी सह गडावरील व्यावसायिक,व खाजगी वाहनधाराक, ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या निर्णयाचा (Government decisions) आनंद व्यक्त केला आहे. केंद्र शासनाने (Central Government) धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड-19 संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शक तत्वे विचारात घेता, सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात (Shri Bhagwati Mandir) प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक (It is mandatory to use a mask) असेल.

सामाजिक अंतराचे पालन (Adherence to social distance) होण्याकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करणे, भाविकांनी एकाच वेळी होणारी गर्दी टाळणे (Avoid crowds), आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह करोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे (Prevention instructions for corona infection) योग्य प्रकारे पालन प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तनी करुन मंदिर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था (Local self-government bodies), प्रशासनास सहकार्य भाविकांना करावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.