Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार; 'या' बड्या नेत्याचा दावा

देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार; ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूवी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (All India Brahmin Federation) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha candidature)द्यावी, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

या मागणीनंतर फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुढेही करत राहतील. ते दिल्लीला (Delhi) जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते असून आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती (BJP-ShivSena Alliance) सरकारचे मुख्यमंत्री होतील.

आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. तसेच त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूवी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत. कर्तृत्वाच्या आधारावरच त्यांचा विचार केला जाणार, त्यामुळे मागणी कोणीही करू शकते असे सांगितले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या