फडणवीसांचा आरोप : मालेगावमधील हिंसा हा प्रयोग

फडणवीसांचा आरोप : मालेगावमधील हिंसा हा प्रयोग
देवेंद्र फडणवीस

मुंबई

नांदेडमध्ये, अमरावतीमध्ये मालेगावमध्ये (malegaon)झालेली हिंसा हा एक प्रयोग असल्याचं सांगत देशात अराजक निर्माण करून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी करत भाजपवर आरोप करणाऱ्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 देवेंद्र फडणवीस
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

भाजपाच्या कार्यकारणी समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. यात राज्यातील भाजपाचे सर्व नेते, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला. मालेगावची घटना साधी नव्हती. हा एक प्रयोग होता. देशात अराजक माजवण्यासाठी अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे. देशात ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयोग आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, एक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का? दुकान हिंदूचं असो की मुस्लिमांचं ते जाळणं चुकीचं आहे. पण एक तरी नेता बोलला का? असा सवाल फडणवीसांनी केला.

 देवेंद्र फडणवीस
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

लसीकरणात मोदींनी आदर्श निर्माण केला

कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं केलेल्या विक्रमाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लसीकरणावरही भाष्य केलं. "देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं असं आज राज्य सरकार सांगतंय. ते चांगलंच आहे. आपला महाराष्ट्र लसवंत होतोय याचा अभिमानच आहे. पण राज्याला या लसी दिल्या कुणी? मोदींनी महाराष्ट्र राज्याकडून होणाऱ्या टीका बाजूला ठेवून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचीच भूमिका ठेवली", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com