...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले

...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले

मुंबई । Mumbai

राज्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले आहे.मात्र १०६ आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी ४० आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केले आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्रीमंडळात जाणार नसल्याचे सांगूनही अर्ध्या तासात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद (deputy cm) कसे स्वीकारले? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्याविषयी खुलासा केला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच नागपूरला (nagpur) भेट दिली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते...

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, या सरकारमध्ये सामिल व्हायचे नाही हे मी ठरवले होते पण भाजप अध्यक्ष (BJP president) जे पी नड्डा (JP Nadda) केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शाह (Amit Shah) यांनी मी सरकारमध्ये सामिल व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद घेतले याचा मला कमीपणा वाटत नाही, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या (shivsena) जीवावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, कार्यकर्ते पाहत होते. मग शिवसेनेत उठाव झाला आणि आम्ही त्यांना साथ दिली. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद (cheif minister post) आम्हाला मिळालं असतं, पण सत्तेकरता नाही तर विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला. हे प्रपोजल मी ठेवले होते असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, २०१९ सालीच भाजपला (bjp) लोकांची पसंती मिळाली, पण चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi) सत्तेत आले. या काळात मला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही याचे दु:ख नव्हते, पण मोदीजींच्या स्वप्नातला देश घडवण्यामध्ये महाराष्ट्र (maharashtra) थांबला याचे दु:ख होते. पण महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही याची खात्री होती. तसेच सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्याचे फडणवीसांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की,गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्ट नव्हती. अनेक राज्य काम करत होते. कोण राज्य चालवतंय ते समजत नव्हते. सामान्य माणसाचे कुणी ऐकायला तयार नव्हते.आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. ते आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा (ganimi kava) आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्याने आणि छत्रपतींसारखे निधड्या छातीने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आले, असे फडणवीसांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com