Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या"अंदाज कुछ अलग है, मेरे सोचने का...”; फडणवीसांची शेरो शायरी आणि विरोधकांना...

“अंदाज कुछ अलग है, मेरे सोचने का…”; फडणवीसांची शेरो शायरी आणि विरोधकांना टोले

शिर्डी | Shirdi

नागपूर-मुंबई समृद्धी (Samruddhi Highway) महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिर्डी ते भरवीर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी ६ ते ८ महिन्यात संपूर्ण मार्ग सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले…

- Advertisement -

”हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज आपण सुरू करत आहोत. तसेच, येत्या सहा ते आठ महिन्यात संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येईल. तिसरा टप्पा सुरू होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल. असा मला विश्वास आहे.”

“राज्याचा विकास करायचा असेल, तर मागास भाग मुंबई आणि बंदरला जोडणं आवश्यक होतं. समृद्धी महामार्ग अनेकांना केवळ स्वप्न आणि घोषणा वाटायचा. पण, मला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता, की महामार्गाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आज ते होताना दिसत आहे. ‘अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलो का शौक हे, और मुछे रास्ते बनाने का,’” अशी शेरो शायरी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण; नागपूर-नाशिक ६ तासांच्या अंतरावर

‘तुम्ही जर प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले तर महाराष्ट्राचा हा प्रकल्प मार्गी लागेल. अनेकांनी विरोध केला. “समृद्धी महामार्गासाठी जागा हस्तांतरित करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. न भुतो असा दर जागेसाठी दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला सभा घेतली, आम्ही जमीन देणार नाही सांगितलं. पवार साहेबांनी बैठक घेतली, पण एकनाथराव बैठकीला गेले, अख्ख्या गावाची रजिस्ट्री एका दिवसात केली, ही जमीन 9 महिन्यांमध्ये एक्वायर केली,’ असं फडणवीस म्हणाले.

‘मी मोपलवार आणि त्यांच्या टीमचा उल्लेख केरन, सौनिक साहेब, प्रविण परदेशी या सगळ्यांनी मेहनत केली. जमीन एक्वायर केली, विरोधी पक्षाचे आमदार भेटले की म्हणायचे तुम्ही फेकताय, पण महामार्ग झाला. पहिलं नवनगर इथेच करू. हा इकोनॉमिक कॉरिडोअर आहे.“राज्यातील पंधरा जिल्ह्यांचं भाग्य समृद्धी महामार्ग बदलणार आहे. आधी मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा. पण, आता गोंदियापर्यंत विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी महामार्गामुळे तयार करू शकणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“संजय राऊत म्हणजे राजकारणातील…”; शिवसेना नेत्याची टीका

इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकर करू, अपघात झाले आहेत. कंडम टायर खराब गाड्या घेऊन महामार्गावर आलात की अपघात होतात, म्हणून सिस्टीम गरजेची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महामार्गावर १२० ची किमी वेग मर्यादा असली, तरी सर्व गाड्या या वेगात चालण्यायोग्य नाहीत. त्यामुळे अशा गाड्या घेऊन वेगाने जाऊ तर अपघात होऊ शकतो. महामार्ग जरी वेगवान असला, तरी आपलं जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या