उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

मुंबई | Mumbai

ठाण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिलेला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे म्हटले होते. त्यांच्या या टीकेला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे...

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...
खासदार संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले...

यावेळी फडणवीस म्हणाले की, नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, मी नागपूरचा असल्याने मला यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, याचं उत्तर त्यांना जनता देईल. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून कसे सरकार चालवले हे संपूर्ण राज्याला माहिती आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगीनघाई; लवकरच उरकणार साखरपुडा!

पुढे ते म्हणाले की, सचिन वाझे सारख्या माणसाला पोलीस दलात घेऊन काय काय धंदे केले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझे तोंड उघडायला लावू नका, मी जर तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल. मी तुमच्या उपकाराने राज्याचा गृहमंत्री नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि सरकार पूर्ण होईपर्यंत राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...
नाशकात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

तसेच पुढे ते म्हणाले की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, असे देवेंद्र फडणवाीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com